कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांचं व्यंगचित्र असलेला उपरोधिक बॅनर

बाळासाहेबांच्या प्रेरणेने एका व्यंगचित्रकाराने हे चित्र माझ्या नावाने बनवले आहे आणि ही संकल्पना माझी आहे. ते निश्चितपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे असे बाळ हरदास यांनी सांगितले.

    कल्याण : सध्या या लोकसभेच्या आणि राजकीय पक्षांच्या हालचालींमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. कोणताही राजकीय पक्ष हा विरोधी पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकताच एक राजकीय बॅनर कल्याणमध्ये चौकात लावण्यात आला आहे. या बॅनरवर राज ठाकरे यांचे व्यंगचित्र काढलेला हा फलक आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हरदास यांनी राज ठाकरे यांचे व्यंगचित्र काढलेला उपरोधिक बॅनर चौकात लावला आहे.

    यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हरदास यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, माझ्याकडे सर्व पक्षाची लोक येत असतात मनसेची सुद्धा लोक येतात. व्हाट्सअँप वर सुद्धा बोलतो आम्ही त्यामुळे जी काही कार्यकर्त्यांची भावना होती त्याप्रमाणे मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने एका व्यंगचित्रकाराने हे चित्र माझ्या नावाने बनवले आहे आणि ही संकल्पना माझी आहे. ते निश्चितपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे असे बाळ हरदास यांनी सांगितले.

    पुढे ते म्हणाले की, आयपीएलमध्ये जसा इम्पॅक्ट प्लेयर असतो, तो खेळाडू नसतो पण त्याला खेळामध्ये घेतले जाते. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की त्यांनी जरांगे सारखं करायला पाहिजे होत की निवडणूक कोणीही लढवणार नाही. मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, अशा प्रकारे राज ठाकरे यांनी केलं पाहिजे होत. मी जरांगे यांचं याबाबतीत अभिनंदन करतो. राज ठाकरे हे दिल्लीला १४-१६ तास थांबले परंतु काही मिळालं नाही आणि इकडे येऊन पंतप्रधान मोदींसाठी महायुतीला बिनशर्त देणे ही अत्यंत शरमेची बाब आहे आणि त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊनच नये असे बाळ हरदास म्हणाले.

    मंदिराबाबत सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचं नाव खराब केलं आहे. सर्व कार्यकर्ते नाराज आहेत त्याच्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रिया येत आहेत. आणि या घटनेसंदर्भात बाळासाहेबांचे काय विचार असते ते मी या व्यंगचित्रामध्ये दाखवले आहेत ते जनतेने पाहावे आणि ठरवावे असे बाळ हरदास म्हणाले.