An IT engineer was cheated by the lure of online task
An IT engineer was cheated by the lure of online task

    पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी आयटी इंजिनिअरची ८ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत आयटी इंजिनिअर तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यास चांगले पैसे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी सोशल मीडियावर वर्कफ्रॉर्म होम जॉब मिळवा जाहिरात दिली. त्या जाहिरातीत विमान प्रवास तिकिटांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखविले. सुरुवातीला विमान प्रवास तिकिटांची नोंदणीच्या कामापोटी तरुणाला चोरट्यांनी २ लाख ५ हजार ७८८ रुपये पाठविले.

    ऑनलाइन काम केल्यास चांगला परतावा

    बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर तरुणाचा विश्वास बसला. ऑनलाइन काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगत त्यालाच गुंतवणूक करण्यास भाग पाडत ८ लाख ४९ हजार रुपये चोरट्यांनी घेतले. बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे तपास करत आहेत.