दहा हजारची लाच घेताना अधिकाऱ्याला पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सामान्य व्यावसायिकाला पैश्यासाठी जीएसटी अंतर्गत केस करून कारवाईची धमकी देणाऱ्या जीएसटीचे सहआयुक्त विशाल बाबु हापटे (वय ३५, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना दहा हजारची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

    कोल्हापूर : सामान्य व्यावसायिकाला पैश्यासाठी जीएसटी अंतर्गत केस करून कारवाईची धमकी देणाऱ्या जीएसटीचे सहआयुक्त विशाल बाबु हापटे (वय ३५, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना दहा हजारची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

    तक्रारदार यांच्या मित्राचा टायर्स विक्रीचा व्यवसाय असून, त्यानी व्यवसायचा जीएसटी भरला नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार लाचेची मागणी केली. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना हापटे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक बापू साळुंके, संजीव बंबरगेकर, सुधीर पाटील, संगीता गावडे, मयूर देसाई, रुपेश माने, संदीप पवार, सुजर अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली.