अग्निपथवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रांची मोठी घोषणा, तरुणांना दिली ‘ही’ ऑफर

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी म्हटले की, अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर ज्यापद्धतीने हिंसाचार उफाळला आहे, त्यामुळे दु:खी आणि निराश झालो आहे. मागील वर्षीदेखील या योजनेवर विचार करण्यात आला तेव्हा, या योजनेमुळे शिस्त आणि कौशल्य (Discipline and skill) असलेले अग्निवीर उपलब्ध होतील. हे अग्निवीर अधिक रोजगार सक्षम होतील असे मी म्हटले होते. आता, या अग्निवीर युवकांना आम्ही नोकरीची संधी तरुणांना देणार असल्याची घोषणा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केली.

  मुंबई : सध्या देशात एका वेगळ्या कारणावरुन वातावरण तापले आहे. आणि याला जबाबदार आहे केंद्र सरकारने आणलेली नवी अग्निपथ योजना, (Agneepath Scheme) देशातील विविध राज्यानी या योजनेला विरोध केला आहे. भारतीय सैन्यदलांत १७ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर (Agneeveer) म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने (Central Government) एक पाऊल मागे घेतलं असून वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. तसेच वाढता विरोध लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Central Home minister depertment) मोठा निर्णय घेतला आहे. ((Major changes in the Agneepath scheme) तरी सुद्धा या योजनेला विरोध होत असून, देशात जाळपोळ व हिंसाचार होत आहे. या हिंसक आंदोलनावर उद्योजक आनंद महिंद्रा हे देखील व्यथित झाले असून त्यांनी तरुणांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट (Anand Mahindra Tweet) करून ही माहिती दिली आहे.

  दरम्यान, आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी म्हटले की, अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर ज्यापद्धतीने हिंसाचार उफाळला आहे, त्यामुळे दु:खी आणि निराश झालो आहे. मागील वर्षीदेखील या योजनेवर विचार करण्यात आला तेव्हा, या योजनेमुळे शिस्त आणि कौशल्य (Discipline and skill) असलेले अग्निवीर उपलब्ध होतील. हे अग्निवीर अधिक रोजगार सक्षम होतील असे मी म्हटले होते. आता, या अग्निवीर युवकांना आम्ही नोकरीची संधी तरुणांना देणार असल्याची घोषणा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केली. महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर काही युजर्सकडून अग्निवीरांना कोणती नोकरी देण्यात येणार असा सवाल उपस्थित केला. याला उत्तर देताना त्यांनी, कॉर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व कौशल्य, टीम वर्क आणि शारिरीक प्रशिक्षण (Leadership skills, teamwork and physical training in the corporate sector) यामुळे अग्निवीरांच्या रुपाने उद्योगजगताला व्यावसायिक मनुष्यबळ मिळेल असे त्यांनी म्हटले. या व्यक्ती प्रशासन, सप्लाय चेन व्यवस्थापन आदींमध्ये काम करू शकतात. आदी संधी तरुणांना आपण देणार असल्याचं उद्योजक आनंद महिंद्रांनी म्हटले आहे.

  नेमकी काय आहे अग्निपथ योजना?

  भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) तरुणांना समाविष्ट केलं जाईल. महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागेल. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील.

  योजनेला का होत आहे विरोध?

  लष्करात भरती होण्याची इच्छा असणारे हे तरुण यामुळे ना आम्हाला, ना देशाला फायदा होणार असल्याचं सांगत आहेत. तरुणांचा अग्निपथ योजनेतील सर्वात जास्त विरोध असणारी बाब म्हणजे चार वर्षांनी फक्त २५ टक्के तरुणांना संधी मिळणार आहे. आंदोलन करणारे चार वर्षांच्या सेवेनंतर काय? असा प्रश्न विचारत आहेत. एका उमेदवाराने सांगितलं की, जो तरुण वयाच्या १७ व्या व्या वर्षी अग्निवीर होईल त्याच्याकडे कोणतीही व्यावसायिक पदवी किंवा कोणतीही विशेष पात्रता नसते. यामुळे नंतर त्याच्याकडे द्वितीय श्रेणीच्या नोकऱ्या स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. चार वर्षानंतर आम्ही कुठे जायचं? असा या तरुणांचा प्रश्न आहे. त्यामुळं तरुणांचा रोष वाढत असून देशभरात हिंसाचार व आंदोलन होत आहे.