…आणि पश्चिम रेल्वेच्या डब्यात एकनाथ शिंदेंचं अचानक लाईव्ह भाषण पाहून प्रवासी अंचबित

पश्चिम रेल्वेवरील (western railway) लोकल ट्रेनमध्ये असलेल्या टीव्ही स्क्रीनवर (TV Screen) दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचे भाषण थेट लाईव्ह दाखवण्यात आले. त्यामुळं काही वेळासाठी पश्चिम रेल्वेचे प्रवासीदेखील चकीत झाले. थेट प्रक्षेपण होत असल्याचे पाहून पश्चिम रेल्वेने तातडीने ते बंद करण्यास सांगितले. तसंच, संबंधित कंत्राटदाराकडून स्पष्टीकरणदेखील मागितले आहे. साधारण हे भाषण 10 ते 15 मिनिटे दाखवल्याचे प्रवासी सांगताहेत.

    मुंबई : दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप होताना काल सर्वांनी पाहिले. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झाला, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा आपपल्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असल्याचे वातावरण केले होते. काल राजधानी मुंबईत दसरा मेळाव्यावरुन वातावरण चांगलेच तापले होते. राज्यातील सत्तातरानंतर शिवसेना व शिंदे गटासाठी कालचा पहिलाच दसरा मेळावा होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच भाषण सुरु असताना, अचानक हे भाषण पश्चिम रेल्वेच्या डब्यात लाईव्ह दिसल्यानं अनेकांनी आश्र्चय व्यक्त केलं आहे.

    दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील (western railway) लोकल ट्रेनमध्ये असलेल्या टीव्ही स्क्रीनवर (TV Screen) दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचे भाषण थेट लाईव्ह दाखवण्यात आले. त्यामुळं काही वेळासाठी पश्चिम रेल्वेचे प्रवासीदेखील चकीत झाले. थेट प्रक्षेपण होत असल्याचे पाहून पश्चिम रेल्वेने तातडीने ते बंद करण्यास सांगितले. तसंच, संबंधित कंत्राटदाराकडून स्पष्टीकरणदेखील मागितले आहे.

    साधारण हे भाषण 10 ते 15 मिनिटे दाखवल्याचे प्रवासी सांगताहेत. एकनाथ शिंदे यांनी भाषण वाचण्यास सुरुवात करताच ५० टक्के लोक सभेतून निघून गेले. पण लोकल ट्रेनमध्ये मुख्यमंत्र्यांचे भाषणाचे लाइव्ह प्रक्षेपण होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत. एका राजकीय गटाच्या सभेचे लाइव्ह प्रक्षेपण लोकल ट्रेनमध्ये दाखवणे, कितपत योग्य असल्याचा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.