….अन् त्याने पेट्रोल ओतून केला स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न ; सोलापूर झेडपीत खळबळ

झेडपी सीईओ दिलीप स्वामी (Solapur ZP CEO Dilip Swami) यांच्या कार्यालय दरवाज्यासमोर आज थरार दिसून आला . मोहोळ तालूक्यातील वाफळे येथील सचिन राजू चव्हाण या इसमाने अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी सचिन चव्हाण यांचा प्रयत्न हाणून पाडला.

    सोलापूर : झेडपी सीईओ दिलीप स्वामी (Solapur ZP CEO Dilip Swami) यांच्या कार्यालय दरवाज्यासमोर आज थरार दिसून आला . मोहोळ तालूक्यातील वाफळे येथील सचिन राजू चव्हाण या इसमाने अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी सचिन चव्हाण यांचा प्रयत्न हाणून पाडला. हा सर्व थरार सीईओ यांच्या कार्यालया समोर घडत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अंगावर पेट्रोल अन हातात काडीपेटी असल्याने झेडपीत मोठी खळबळ उडाली.

    याबाबत सचिन चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालूक्यातील वाफळे येथील स्थानिक पुढारीपण करणारे माणिक नलावडे यांनी ग्रामपंचायतीची बेकायदेशीर जागा हडप करून व्यापारी गाळे बांधले . या बेकायदेशीर कामकाजाबाबत आंदोलन करण्यात आले तेव्हा झेडपी प्रशासनाकडून गाळे सील करण्यात आले होते. कोणती ही कायदेशीर परवानगी न घेता माणिक नलावडे यांनी सील तोडून व्यापारी गाळे खुले केले आहेत. यावर कारवाई व्हावी यासाठीचव्हाण यांनी सातत्याने प्रयत्न केला. मात्र मोहोळ बीडीओ अन् विस्तारधिकाऱ्यानी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

    सोमवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी सीईओ यांच्या कार्यालयाबाहेर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडी नंतर वाफळे येथील गाळयांची संपूर्ण माहीती मागवली आहे.आंदोलनकर्ते सचिन चव्हाण यांना माणिक नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याचे सचिन चव्हाण यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.