aanganewadi jatra

आंगणेवाडीच्या जत्रेला (Anganewadi Jatra 2023) फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांतील अनेक ठिकाणांहून लोक येत असतात. यंदादेखील तसेच मालवण मसुरे गावच्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला गर्दी होण्याची शक्यता आहे.

    नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडी(Anganewadi Jatra 2023) येथील भराडी देवीचा (Bharadi Devi) वार्षिकोत्सव ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. इथल्या प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

    आंगणेवाडीच्या जत्रेला फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांतील अनेक ठिकाणांहून लोक येत असतात. (Anganewadi Jatra). यंदादेखील तसेच मालवण मसुरे गावच्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला गर्दी होण्याची शक्यता आहे. दीड दिवसाच्या या यात्रेसाठी कलाकार आणि राजकारणी मंडळीदेखील हजेरी लावतात.

    मालवण तालुक्यातील मसुरे गावात आंगणेवाडी नावाची वाडी आहे. या वाडीमध्ये ‘भराडी देवी’ विराजमान आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.

    मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी म्हणून ही देवी प्रसिद्ध झाल्याने सर्व भाविकांना मंदिर खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.