amrita fadnavis

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यापूर्वीही त्यांनी मुंबईबद्दल वक्तव्य केले होते. या सर्व वक्तव्यावरून राज्यपालविरोधात राज्यात संताप व्यक्त होत आहे.

    मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या बेताल वक्तव्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. उलट त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, अशी स्पष्टोक्तीच त्यांनी दिली.

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यापूर्वीही त्यांनी मुंबईबद्दल वक्तव्य केले होते. या सर्व वक्तव्यावरून राज्यपालविरोधात राज्यात संताप व्यक्त होत आहे. खुद्द भाजपमधूनही राज्यपालांच्या वक्तव्यार सौम्य भाषेत टीका झाली असतानाच अमृता फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे.

    अमृता फडणवीस म्हणाल्या, राज्यपालांचे मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. मी राज्यपालांना चांगले ओळखते. ते एकमेव राज्यपाल आहेत की, महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठी भाषा शिकली. त्यांचे मराठी भाषेवर प्रेम आहे. ते मनापासून मराठी माणसावर प्रेम करणारे आहेत. ते जे बोलतात त्याचा वेगळा अर्थ काढला जातो.