अनिल बाबर खलनायक नव्हे नायक  : सुहास बाबर

कोयना धरणातील पाणी सोडण्याबाबत विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर खलनायक आहेत का, अशी टीका केली होती. अनिल खलनायक नाहीत तर नायक आहेत, अशी जोरदार टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर केली.

  विटा : कोयना धरणातील पाणी सोडण्याबाबत विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर खलनायक आहेत का, अशी टीका केली होती. अनिल खलनायक नाहीत तर नायक आहेत, अशी जोरदार टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई यांची उंची कमी अथवा जास्त करण्याचा प्रश्न उद्ध्वस्त नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.येथील चौंडीश्वर चौकात असणाऱ्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा सदस्य फिरोज शेख उपस्थित होते.
  बाबर म्हणाले, वैभव पाटील यांचा राजकीय इतिहास पाहता तुम्ही कधीच कुणाशी प्रामाणिक राहिला नाहीत. २०१४ व २०१९ ला तुम्ही संजय पाटील यांना खासदार करताना तुम्ही कुठे होता. प्रत्येक वेळी ‘वापरा आणि फेका’ ही तुमची पद्धत आहे. वैभव पाटील जरा सुबरीने घ्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला अनिल बाबर यांचा प्रचार करायचा आहे. तेव्हा थोडं धीर धरा.
  बाबर म्हणाले, म्हणाले,  तुम्हाला इतकी घाई कशाची झाली आहे. विधानसभा निवडणूका अजून लांब आहेत.‌ विधानसभा निवडणुकीचा घाई कशासाठी करता आहात? असा सवाल त्यांनी केला. टेंभू योजनेच्या पुर्णत्वासाठी संपतराव देशमुख, गणपतराव देशमुख, नागनाथ नायकवडी, राजेंद्र देशमुख, अनिल बाबर यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले आहेत. तुमचे वडील दहा वर्ष असताना योजनेच्या पुर्णात्वासाठी काय केले. उलट योजनेची टिंगल केली. दिवास्वप्न म्हणून हिणवले. आता योजनेचे पाणी शिवारात दिसू लागल्याने टेंभू योजनेची आठवण झाली आहे. अशी बोचरी टीका केली.

  देसाई यांच्यावरील टीकेचं कारण वेगळं
  कोयना धरणातून पाणी सोडण्या संंदर्भात टीका करताना शंभूराज देसाई यांच्यावर टीका करण्याचे कारण वेगळं आहे. पाटण तालुक्यात विट्याच्या शितोळे समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थानाचा प्रश्न सोडविला आहे. परिणामी, शितोळे समाज आमच्याकडे वळला आहे. ते त्यांना कुठंतरी खुपत आहे. हे देसाई यांच्यावर टीका करण्याचे कारण आहे. तुमच्या कुंटुबियांची पन्नास वर्षांहून विटा शहरात सत्ता आहे. तुम्ही साधे शहराला पिण्याच्या पाणी पुरेसे देऊ शकला नाही, अशी टीका बाबर यांनी केली.

  पाणी साेडण्यासाठी केला पाठपुरावा
  कृष्णा नदी कोरडी पडली असताना आणि जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असताना जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे कृष्णा नदीत कोयना धरणाचे पाणी सोडण्यासाठी चर्चा करुन‌ मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार आमदार बाबर यांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा केला. कृष्णा नदीत पाणी सोडले गेले. तोपर्यंत कुणाची तक्रार नव्हती. त्यानंतर अनेक पत्रकार परिषदा सुरु झाल्या, असे बाबत म्हणाले.