Aditya Thackeray
Aditya Thackeray

आदित्य ठाकरे हे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. त्यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो. सुनबाई जर विदर्भातील असेल तर चांगले होईल, अशी खास वैदर्भीय प्रतिक्रिया खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

    मुंबई : आदित्य ठाकरे हे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. त्यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो. सुनबाई जर विदर्भातील असेल तर चांगले होईल, अशी खास वैदर्भीय प्रतिक्रिया खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

    भाजप प्रदेश कार्यालयात आज खासदार डॉ. अनिल बोंडे यांची पत्रकार परिषद आयोजित आली होती. यावेळी डॉ. अनिल बोंडे यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे लवकरच शुभ मंगल होवो, अशी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

    केंद्र सरकारने नाफेड, अन्न महामंडळामार्फत ७७ लाख क्विंटल चणा खरेदी केली आहे. केंद्र सरकारने आपल्या कोट्यातील संपूर्ण २५ टक्के खरेदी पूर्ण केली आहे. आता राज्य सरकारने खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील ४ ते ५ लाख क्विंटल चणा खरेदी करावा अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली. या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

    राज्य सरकारला खरेदी करणे शक्य नसेल तर फडणवीस सरकारप्रमाणे भावांतर योजना राबवावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.