मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यांना आरक्षणाची गरज आहे, अनिल देशमुखांनी महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची माफी मागावी – आशिष देशमुख

मराठा समाजाला घेऊन अजित पवार यांना अडचणीत अडकवून पुन्हा आपल्या पक्षात परत आण्याचा असा डाव शरद पवार यांचा आहे.

    आशिष देशमुख : मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्यामुळे अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. याचदरम्यान भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण त्यांना ओबीसीमधून नव्हे तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका भाजपची आहे. मराठा समाजाला घेऊन अजित पवार यांना अडचणीत अडकवून पुन्हा आपल्या पक्षात परत आण्याचा असा डाव शरद पवार यांचा आहे असे आशिष देशमुख म्हणाले.

    पुढे आशिष देशमुख म्हणाले, ओबीसी यांची टक्केवारी कमी झाली नाही पाहिजे. यासाठी एकटे विजय वडेट्टीवारच नाही, आम्ही सर्व ओबीसीनेते त्यासाठी उभे आहोत. पण मराठा समाजाला पण आरक्षण देण्यात यावे, कारण की त्यांना पण गरज आहे. मराठा समाज देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवतो. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारने ही केस व्यवस्थित हाताळली नाही म्हणून सुप्रीम कोर्टात ते टिकू शकले नाही असे आशिष देशमुखांनी सांगितले.

    पुढे ते म्हणाले, जर कोणाला नार्को टेस्ट करायची असेल तर अनिल देशमुख यांनी नार्को टेस्ट करावी. करण की अनिल देशमुख यांनी ग्रह मंत्रालयावर खोटे आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी आशिष देशमुखांनी केली आहे.