किरीट सोमय्यांची नौटंकी सुरु आहे, अनिल परब यांचा पलटवार

हे रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटींचा खर्च येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटींहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यश कन्स्ट्रक्शनचे विजयकुमार त्रिपाठी यांची या पाडकामासाठी नियुक्ती करण्यात आली असून, तेच या रिसॉर्टवर हातोडा मारणार आहेत. यासाठी काल सोमय्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. तसेच ते आज दापोलीत दाखल झाले आहेत. दरम्यान, यावर अनिल परब यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    मुंबई : साई रिसॉर्ट, दापोली (Sai Resort Dapoli) अनधिकृत बांधकाम प्रकरणी माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब (Anil parab) यांची ईडीने चौकशी केली होती. तसेच मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) पैसा या रिसॉर्टमध्ये वळविल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केला आहे. तसेच या रिसॉर्टचे अनाधिकृत  बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. आणि हे रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसा कुठून आला? हे अनिल परबांनी सांगावे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळं हे रिसॉर्ट अनधिकृत असून, अनिल परब यांच्या या रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार असल्याचे सोमय्या यांनी यापूर्वीच म्हटले आहे. त्यासाठी आज सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत.

    दरम्यान, हे रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटींचा खर्च येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटींहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यश कन्स्ट्रक्शनचे विजयकुमार त्रिपाठी यांची या पाडकामासाठी नियुक्ती करण्यात आली असून, तेच या रिसॉर्टवर हातोडा मारणार आहेत. यासाठी काल सोमय्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. तसेच ते आज दापोलीत दाखल झाले आहेत. दरम्यान, यावर अनिल परब यांची प्रतिक्रिया समोर आली असून, किरीट सोमय्या सध्या जे काय करत आहेत, ते किरीट सोमय्यांची ही नौटंकी सुरु असल्याचा घणाघात आमदार अनिल परब यांनी केला आहे. तसेच या बांधकामात कोणताही मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) पैसा आला नसल्याचा पलटवार अनिल परब यांनी केला आहे.