संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार का ? अनिल परब यांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आजच्या बैठकीत मेस्माबाबतचा (Mesma Decision Will Be Taken) निर्णय होईल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मेस्माबाबतचा निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.

    मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (MSRTC Workers Strike) अजूनही तोडगा निघालेला नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आजच्या बैठकीत मेस्माबाबतचा (Mesma Decision Will Be Taken) निर्णय होईल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मेस्माबाबतचा निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.

    निलंबित कामगारांवर कारवाई सुरू आहे. काही बडतर्फ झाले आहेत. या कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत असं त्यांना सांगितलं जात आहे. त्यामुळे कर्मचारी संपात आहेत. पण लोकांना वेठीस धरणं योग्य नाही. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून मेस्मा लावला जातो. या बाबतीत बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेऊ. मेस्मा कसा लावायचा किंवा आणखी काय करायचं ते पाहू. मेस्मा कुणाला लावायचा हे चर्चेअंतीच ठरवलं जाईल, असं परब म्हणाले.

    संपाचा तिढा कायम आहे. कामगारांसाठी ज्या गोष्टी करणं शक्य होतं ते सर्व केलं आहे. सर्वाधिक पगारवाढ दिली आहे. पगार वेळेत देण्याची हमी घेतली आहे. तरीही कामगार भरकटलेले आहेत. दिशाहीन झाले आहेत. त्यांना वाटतं ताबडतोब आपला निकाल लागेल. पण कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे सरकार निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही हे वारंवार सांगत आहोत. २० तारखेला विलीनीकरण करून घेऊ असं त्यांचे वकील सांगत आहे. त्यामुळे हे कर्मचारी २० तारखेपर्यंत कामावर येणार नसल्याचं कळत आहे, असं त्यांनी सांगितलं.