Bageshwar Baba's satsang

    पुणे : पुण्यात हाेणाऱ्या बागेश्वर बाबांच्या सत्संग व दरबार कार्यक्रमाचे व्हीडीओ शुटींग करावे, त्यांनी जादुटाेणा विराेधी कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अनिंस ) केली आहे.

    भाजपचे जगदीश मुळीक यांच्यावतीने दरबार

    भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वतीने बागेश्वर बाबा यांचा सत्संग आणि दरबाराचे पुण्यात २० ते २२ नाव्हेंबर या कालावधीत आयाेजन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत अनिंसचे विशाल विमल, एकनाथ पाठक, स्वप्नील भाेसले, प्रतिक पाटील आदींनी भूमिका स्पष्ट केली. बागेश्वर बाबा यांच्याकडून घटनाविराेधी अशास्त्रीय दावे केले जातात, अपरिचित व्यक्तींच्या भूतकाळात घडलेल्या गाेष्टी अचुकपणे कागदावर लिहुन देणे, लाेकांच्या मनात काय आहे ते ओळखणे, रावणासाेबत फाेनद्वारे बाेलणे, आजार बरे करणे, भूत-प्रेते पळवून लावणे, लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देताे. ईश्वराचा दुत आहे असे दावे त्यांच्याकडून केले जात आहे.

    अनिंसने केलेले दावे

    अशास्त्रीय व अवैज्ञानिक दावे करून लाेकांना ते प्रभावित करीत आहेत. केंद्र सरकारचा ड्रग्ज अॅंड मॅजिक रेमिडीज अडव्हरटायजमेंट अॉब्जेक्शन नेबल अॅक्ट, राज्यात लागू असललेल्या जादूटाेणा विराेधी कायद्याचे त्यांच्याकडून उल्लंघन हाेत अाहे. तसेच त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयीची बदनामीकारक वक्तव्ये केली अाहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे, असे विमल यांनी नमूद केले.