अंकिता पाटील-ठाकरे यांचा जिल्ह्यात दौरा सुरू ; बारामती शहरातून संपर्क अभियानाला सुरुवात , अनेकांच्या भुवया उंचावल्या

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा व माजी सहकार मंत्री यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आपल्या निवडीनंतर बारामती लोकसभा मतदार संघात दौरा सूरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी बारामती शहरातून रविवारी (दि २५) केली असून त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

    अमोल तोरणे, बारामती:  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा व माजी सहकार मंत्री यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आपल्या निवडीनंतर बारामती लोकसभा मतदार संघात दौरा सूरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी बारामती शहरातून रविवारी (दि २५) केली असून त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

    अंकिता पाटील ठाकरे यांची नुकतीच भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या तिसऱ्या दिवशी पासून त्यांनी भाजप च्या कामास जोमात सुरुवात केली असून रविवारी (दि २४) त्यांनी बारामती शहरातील भाजप कार्यालयास भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी २०२४ चा बारामती लोकसभेचा खासदार भाजपचाच असल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव ॲड सुधीर पाटसकर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने, अंकिता पाटील ठाकरे यांनी पाटसकर यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. याचवेळी खासदार सुप्रिया सुळे पाटसकर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आल्या होत्या, या दोघींचीही समोरासमोर भेट झाल्यानंतर, खासदार सुळे अंकिता पाटील ठाकरे यांना म्हणाल्या,”अंकिता आपली सारखी भेट होत आहे, त्यामुळे नक्कीच आपल्यात नक्कीच साम्य आहे”असे उद्गार काढले. यावेळी उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

    दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुती कडून उमेदवार कोण असणार, याबाबत विविध तर्कवितर्क काढण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गट व अजित पवार गट या राष्ट्रवादीतील दोन गटातील संघर्ष आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढत चालला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार कुटुंबातीलच उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी बारामती शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आल्या आहे. त्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पार्थ पवार निवडणूक लढवतात का, याबाबत विविध तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.

    दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अंकिता पाटील ठाकरे यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी या पदाची धुरा हाती मिळताच पहिली सुरुवात बारामतीतून करून विविध गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. बारामती शहरातील दौऱ्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध भागांसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंकिता पाटील दौरा करणार आहेत. दरम्यान अंकिता पाटील यांचे वडील व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कदाचित भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. राष्ट्रवादीतील दुफळीनंतर हर्षवर्धन पाटील यांचे नाव मागे पडले. पार्थ पवार यांचे नाव महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे, त्यातच अंकिता पाटील ठाकरे जिल्हा संपर्क दौऱ्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत.

    जेंव्हा खासदार सुळे – अंकिता पाटील समोरासमोर येतात
    मनसेचे राज्य सचिव सुधीर पाटसकर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने पाटसकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रविवारी खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या पाटसकर यांच्या घरी आल्या होत्या, त्याचवेळी अंकिता पाटील ठाकरे यादेखील त्या ठिकाणी सांत्वन करण्यासाठी आल्या होत्या, या दोघींचीही समोरासमोर भेट झाली, खा सुळे यांनी अंकिता पाटील यांची विचारपूस करत “अंकिता आपली सारखी भेट होतीय, त्यामुळे आपल्या दोघीत नक्कीच साम्य आहे, त्यादिवशी एअर पोर्ट वर देखील भेट झाली”असे त्या म्हणाल्या.