बच्चू कडूंना धक्का, अकोल्यात प्रहारच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये घडत असलेल्या कृतीशी विचारांशी मी सहमत नाही. त्यामुळं मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून....फुले , शाहू , आंबेडकरांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार करावा. अशी विनवणीही पत्रातून केली आहे.

    अकोला – अकोल्यात प्रहारचे अंकुश श्रीकृष्ण तायडे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा बच्चू कडू यांच्याकडं पाठविला आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन पक्षात असून पक्षाचा कट्टर कार्यकर्ता राहिलेला असून पक्षाचा संघर्ष मी बघितलेला आहे हा पक्ष अपंगासाठी शेतकऱ्यांसाठी झटणारा पक्ष होता. पण आजची परिस्थिती अशी आहे , की हा संघर्ष कधी सत्ता परिवर्तनाकडे गेला हे कळले नाही. त्यामुळे आता लोकशाहीची हत्या झाली आहे. त्यामुळे माझी या पक्षात राहण्याची इच्छा नसल्याने प्रहारचे कार्यकर्ते अंकुश तायडे यांनी आमल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.

    काल पक्षाचे संपर्क कार्यालय बंद असल्याने रात्री साडेनऊ वाजता ट्विट करून राजीनामा दिला असल्याची अंकुश तायडे यांनी आपली माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये घडत असलेल्या कृतीशी विचारांशी मी सहमत नाही. त्यामुळं मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून….फुले , शाहू , आंबेडकरांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार करावा. अशी विनवणीही पत्रातून केली आहे.