माॅलमध्ये वाईन विक्रिला अण्णा हजारेंचा विरोध, म्हणाले…

अण्णा म्हणाले की माॅलमधे वाईन विक्रिला ठेवने ही भारतीय संस्कृती नसुन विदेशी संस्कृती आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी होतात हे बरोबर नाही. आत्ताचे सरकार माॅलमधे दारू विक्राचा विचार करणार नाही आणि जर तसे झाले तर नाईलाने पुन्हा आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल.

    अहमदनगर – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पुण्यात बोलताना माॅलमधे वाईन विक्रीची हरकती मागवित आहोत आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांच्याशी चर्चा करू असे वक्तव्य केले होते. त्याला समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवत आमच्या पर्यत आजुन आले नाही. आले की आम्ही आमच्या मार्गाने जाऊ असा अण्णांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.

    अण्णा म्हणाले की माॅलमधे वाईन विक्रिला ठेवने ही भारतीय संस्कृती नसुन विदेशी संस्कृती आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी होतात हे बरोबर नाही. आत्ताचे सरकार माॅलमधे दारू विक्राचा विचार करणार नाही आणि जर तसे झाले तर नाईलाने पुन्हा आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल. या आधी अण्णांनी या निर्णयाला विरोध दर्शवत तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन निर्णयाला विरोध दर्शवीला होता.

    राळेगण-सिद्धी येथे आंदोलन देखील केले होते. मात्र अण्णांच्या मागीचा विचार करत सरकाने या संबधी लोकांच्या हरकती मागु असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णा हजारेनी आपले आंदोलन मागे घेतले होते. त्या नंतर सत्तांतर झाले आता परत हा मुद्दा समोर आल्याने अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला इशाला दिला आहे.