अण्णाभाऊ साठेंनी लेखणीतून उपेक्षितांना न्याय दिला : डॉ. विश्वजित कदम

स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ हे अग्रगण्य व्यक्तिमत्त्व असून ते समाजसुधारक व साहित्यरत्न होते. त्यांनी लेखणीच्या माध्यमातून उपेक्षितांना न्याय दिला. त्यांच्या 'माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली' या पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी समाजपरिवर्तन केले. असे मत आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

    भिलवडी : स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ (Annabhau Sathe) हे अग्रगण्य व्यक्तिमत्त्व असून ते समाजसुधारक व साहित्यरत्न होते. त्यांनी लेखणीच्या माध्यमातून उपेक्षितांना न्याय दिला. त्यांच्या ‘माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली’ या पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी समाजपरिवर्तन केले. असे मत आमदार डॉ. विश्वजीत कदम (Dr. Vishwajit Kadam) यांनी यावेळी व्यक्त केले.

    साठेनगरमध्ये ग्रामपंचायत फंडातून निर्माण केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा माजी राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, माजी जि. प. सदस्य संग्राम पाटील, रोहन लाड, सरपंच विद्याताई पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

    दरम्यान वसगडे येथे अर्थसंकल्प योजना सन २०२०-२१ मधून माळवाडी ते वसगडे रस्ता सुधारणा करणे या एक कोटीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ डॉ. कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. येथील सर्पमित्र दीपक परीट यांनी उभारलेल्या ऑक्सिजन पार्कलाही भेट दिली.