लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आळंदीत साजरी

    आळंदी : आळंदी नगरपरिषद, भाईचारा फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, आळंदी टपरी पथारी, हातगाडी पंचायत अशा विविध सेवाभावी संस्था, रिपब्लिकन सेनेचे वतीने विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त साहित्य क्रांती ज्योत वाटेगाव – पुणे मार्गे आळंदी येथे जल्लोषात आणण्यात आली. आळंदीत क्रांतीज्योत आगमनाचे स्वागत करण्यात आले.

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन

    आळंदी नगरपरिषद, भाजी मंडई ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून साहित्य क्रांती ज्योत नियोजित लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक जागेत अभिवादन सभेस आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, या मागणीसाठी या वर्षी साहित्य क्रांती ज्योत वाटेगाव येथून पुणे मार्गे आळंदीत आणण्यात आली. या मार्गावर जनजागृतीदेखील करण्यात आली. या प्रसंगी पथारी संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे, लहुराज गायकवाड, सुनील भिसे, संजय भंडे, जिल्हा सरचिटणीस  गोरक्षनाथ पवळे, सुरेश आहेरकर, पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल संतोष सोनवणे अध्यक्ष संतोष सोनवणे, महिला विंग संयोजिका नीलम सोनवणे, आबा शिंदे, गणेश काळे, युवा उद्योजक राहुल चव्हाण,दक्षता सेवा फाउंडेशन अध्यक्ष किरण नरके, उद्धव  कांबळे, अविनाश पाटोळे, अमर कांबळे, आदेश सोनवणे यांचेसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, समाज बांधव उपस्थित होते.