आनंदराव अडसूळांचा नेतेपदाचा राजीनामा; शिवसेनेला आणखी झटका

अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिले नाही. ईडीने केलेल्या कारवाईवेळी आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजीनाम्यानंतर अडसूळ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, अडसूळ यांचा मुलगा अभिजीत हा आधीपासूनच शिंदे गटासोबत आहे.

    मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा (Shivsena Leader Resign) दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अडसूळ यांनी पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवले असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रात पक्षाबाबत खंत व्यक्त (Expressed Grief) केली आहे.

    अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिले नाही. ईडीने (ED) केलेल्या कारवाईवेळी आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजीनाम्यानंतर अडसूळ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, अडसूळ यांचा मुलगा अभिजीत हा आधीपासूनच शिंदे गटासोबत आहे. या घटनेनंतर आमदारांबरोबर खासदारांचीही शिवसेना पक्षातून गळती सुरू झाल्याचे उघड झाले आहे.

    खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मत करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यांनी ठाकरेंना पत्र लिहित भाजपच्या उमेदवार मुर्मू (BJP Draupadi Murmu) यांना मत करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडानंतर खासदारांच्या मनातील नाराजी बाहेर येत असल्याचे दिसत आहे.