गोळीबारच्या आधी आमदारांच्या मुलाला शिवसेना कार्यकर्त्यांनी डिवचले का?;  दुसरा सीसीटीव्ही आले समोर

महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यानंतर या प्रकरणातील दुसरे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

    ठाणे : उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये (Ulhasnagar Hillline Police Station) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर केलेल्या गोळीबारावरुन राज्यात वादंग निर्माण झाला आहे. महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच केलेल्या गोळीबाराचे (Ulhasnagar firing Case) सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यानंतर या प्रकरणातील दुसरे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये महेश गायकवाड यांचे कार्यकर्ते भाजप आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) यांना डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

    भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार नंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांच्या मुलाला पोलिस स्टेशनसमोर मारले जात असल्याचे आपल्या वक्तव्यामध्ये म्हटले होते. गोळीबार केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे देखील ते गणपत गायकवाड म्हणाले होते. आता गोळीबार केल्याच्या आधीच्या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड हा वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमधून बाहेर पडताना दिसत आहे. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे कार्यकर्ते काही तरी बोलत आहेत. वैभव गायकवाडला डिवचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसूनत येत आहे.

    उल्हासनगर भाजप आमदार गायकवाड यांनी शिवसेना यांच्यासह त्याचा साथीदार राहूल पाटील याच्यावर गोळीबार केला होता. हा धक्कादायक सीसीटीव्ही बाहेर आला होता आत्ता वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल जगताप यांच्या केबीन बाहेरचा सीसीटीव्ही समोर आला आहे. यामध्ये वैभव गायकवाड हे केबीनच्या बाहेर पडतात. तेव्हा महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्याकडून काही तरी बोलले जाते. या नंतर वैभव गायकवाड पुन्हा मागे वळतात. ते ही काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बोलतात. या दरम्यान दोन्ही गटाकडून धक्काबूक्की सुरु होते. पोलिसांकडून मध्यस्थीचा प्रयत्न केला जातो. हे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर गोळीबार करण्याच्या आधी गायकवाड यांच्या मुलाला डिवचण्याचा प्रयत्न झाला होता का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे