महाराष्ट्रातले दुसरे किरीट सोमय्या म्हणजे नितेश राणे – सुशांत नाईक

भाजपा आमदार नितेश राणे ज्या पध्दतीने रोज प्रेस घेवून शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत व विनायक राऊत असतील किंवा अन्य नेत्यांवर जे टिका करत आहेत. ते चुकीची आहे. खरतर नितेश राणेंनी गेली ३४ वर्षे विविध मंत्री पदावर राहून काम केलं.

    कणकवली : भाजपा आमदार नितेश राणे ज्या पध्दतीने रोज प्रेस घेवून शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत व विनायक राऊत असतील किंवा अन्य नेत्यांवर जे टिका करत आहेत. ते चुकीची आहे. खरतर नितेश राणेंनी गेली ३४ वर्षे विविध मंत्री पदावर राहून काम केलं. या ३४ वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केले ? हे विचारण्याची गरज आहे. तर स्वत: नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून १० वर्षे काम करत आहेत. त्यांनी केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले दुसरे किरीट सोमय्या म्हणजे नितेश राणे असल्याचा घाणाघाती आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.

    कणकवली येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर,उध्दव पारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुशांत नाईक म्हणाले , नितेश राणेंनी स्वत:च्या वडिलांनाच विचारणा केली पाहिजे. कारण गेली ३४ वर्ष त्यांच्या वडिलांना मंत्रीपद , आमदार, राज्यमंत्री पद, मुख्यमंत्री पद आणि आज ते केंद्रीय मंत्री पदावर आहेत. गेल्या ३४ वर्षात त्यांनी काय विकास केलाय आणि त्यांनी किती रोजगार दिले आहेत. याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी देण्याची गरज आहे. याबाबत नितेश राणे आपल्या वडिलांना विचारणार आहेत का ? त्यांची तेवढी हिम्मत आहे का ? कारण गेली १० वर्ष विनायक राऊत यांनी काय केले अशी विचारणा ते करत आहेत. त्यामुळेत त्यांनी गेल्या ३४ वर्षाच्या कार्यकाळात काय केले ? याची माहिती लोकांना द्यावी.

    आत्तापर्यंत गेली ३४ वर्षे त्यांच्याच कुटुंबियांकडे मंत्रीपद,आमदार,राज्यमंत्री पद, मुख्यमंत्री पद असेल किंवा केंद्रीय मंत्री पद अशी विविध पदे त्यांना जनतेनी बहाल केलेली आहेत. परंतु त्यांनी सिंधुदुर्ग वासियांसाठी काय केले आहे हे विचारण्याची वेळ लोकांवरती आलेली आहे ? त्यामुळे नितेश राणेंनी आपले वडील नारायण राणेंना हा जाब विचारावा व त्यानंतरच नितेश राणेंनी बाकीच्यांवर टिका करावी. याआधी सुध्दा महाराष्ट्रातले मोठे नेते किरीट सोमय्या हे रोज उठून प्रेस घ्यायचे. सीबीआयची धमकी दाखवून सगळ्या नेत्यांना ब्लॅकमेल करायचे. आणि आज त्यांची अवस्था काय आहे ? ती सर्वांना महिती असल्याचा टोला सुशांत नाईक यांनी लगावला.