
बिहारमधील त्या तरुणीने रिसोडच्या तरुणाशी सात जन्माचे बंधन बांधण्याचा निर्णय घेतला आणि बिहार मधील झाझा ते वाशिम रस्त्याने रिसोड गाठले. या दरम्यान ती तिच्या प्रियकराच्या सतत संपर्कात होती. याची माहिती ना मुलीच्या घरच्यांना होती ना मुलाच्या घरच्यांना. मात्र, परिस्थिती समजून मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला.
रिसोड : प्रेम आंधळं असतं त्यात जात धर्म,वय,रूप, दर्जा दिसत नाही, असे म्हणतात. काही वर्षांपासून सोशल मीडियावर सुरू असलेली ओळख प्रेमाचे रूप घेत बिहारमधील त्या तरुणीने रिसोडच्या तरुणाशी सात जन्माचे बंधन बांधण्याचा निर्णय घेतला आणि बिहार मधील झाझा ते वाशिम रस्त्याने रिसोड गाठले.
या दरम्यान ती तिच्या प्रियकराच्या सतत संपर्कात होती. याची माहिती ना मुलीच्या घरच्यांना होती ना मुलाच्या घरच्यांना. मात्र, परिस्थिती समजून मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. २४ मे रोजी रिसोड पोलीस ठाण्यात बिहार येथील तरुणीला तिच्या पालकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. सोशल मीडियावरून झालेल्या प्रेमाला ब्रेक लागला. रिसोड पोलीस ठाण्यातून मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन असल्याने ती मुलगी सात जन्माच्या बंधनात अडकू शकली नाही. अशी एक घटना रिसोडच्या वाशीम मार्गावरील परिसरात उघडकीस आली.