भगवानपूर येथे वाघाने घेतला आणखी एकाचा बळी; आठवडाभरापासून होता बेपत्ता

जिल्ह्यात जंगली हत्तींसह वाघांची प्रचंड दहशत कायम आहे. वाघाने शेकडो जनावरांचा फडशा पाडला असून, यात अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले आहेत. अशातच गडचिरोली तालुक्यातील भगवानपूर जंगल परिसरात वाघाने एका व्यक्तीवर हल्ला चढवित ठार केले.

    गडचिरोली : जिल्ह्यात जंगली हत्तींसह वाघांची प्रचंड दहशत कायम आहे. वाघाने शेकडो जनावरांचा फडशा पाडला असून, यात अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले आहेत. अशातच गडचिरोली तालुक्यातील भगवानपूर जंगल परिसरात वाघाने एका व्यक्तीवर हल्ला चढवित ठार केले.

    गंगाराम कवडू फेगुलवार (वय 55, रा. भगवानपूर) असे मृतक इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात वाघाची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, गंगाराम फेगुलवार हे मागील आठवड्याभरापासून बेपत्ता होते. यासंदर्भात गंगारामच्या पतीने गुरुवारी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याअंतर्गत पोलिसांनी शोध मोहिम आरंभली होती.

    दरम्यान, शुक्रवारी भगवानपूर गाव जंगल परिसरालगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे यावेळी मृतदेहाचे तुकडे पडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच हातातील राखी व चावीमुळे पटली ओळख भगवानपूर गावालगतच्या जंगल परिसरात तुकडे पडलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली.

    या माहितीच्या आधारे ठाणेदार अरुण फेगडे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळ गाठले. मात्र छिन्नविछिन्न अवस्थेत असलेल्या मृतदेहाहमुळे ओळख पटविणे कठीण होऊन बसले होते. मृतकाच्या हाताला असलेली राखी व कमरेला असलेल्या चावीमुळे मृतक भगवानपूर येथील गंगाराम फेगुलवारची ओळख पटविण्यात यश आले.