शिवसेनेचे आणखी दिग्गज सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला. त्यातच शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल (Not Reachable) आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत.

    मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला. त्यातच शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल (Not Reachable) आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. यामध्ये आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांचा समावेश आहे.

    मंगेश कुडाळकर हे कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर, सदा सरवणकर हे दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे आमदार आहेत.