Talathi, a bribe-taker in Maval, in ACB's net; A bribe of 50,000 was taken for registration on seven-twelve passages
ACB action

  पुणे/अक्षय फाटक : सरकार भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आटोकोट प्रयत्न करत असताना राज्यात भ्रष्टाचार वाढल्याचे धक्कादायक वास्तव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे “भ्रष्टाचार मुक्त राज्य” या शासनाच्या “दिव्यस्वप्ना”ला शासकीय लोकसेवकच “मातीत” मिसळवत असल्याचे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

  यंदा ११ टक्यांनी भ्रष्टाचार वाढला

  वर्षभरात एसीबीने राज्यातील साडेसातशे सापळा कारवाया केल्या असून, तब्बल १ हजार ४४ जणांना लाच घेताना पकडले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११ टक्यांनी भ्रष्टाचार वाढला आहे.

  लाच स्वरूपात जमवली माया 

  देशभरात आज (दि. ९ डिसेंबर) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. शासनाकडून राज्यातील भ्रष्टाचार समूळनष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु, दर‌वर्षीचे वास्तव मात्र वेगळेच पाहिला मिळत आहे. कामासाठी सर्व सामान्य नागरिकांना अडवून त्यांच्याकडून लाच स्वरूपात माया गोळा केली जात असल्याचे दिसत आहे.

  “सापळ्या”त न अडकण्यासाठी नामी क्लुप्ती

  यामध्ये “क्लास वनसह क्लास फोर” अशा सर्व स्थरावर कारवाई होत असल्याचे एसीबीच्या माहितीनुसार दिसत आहे. लोकसेवकांनी आता या “सापळ्या”त न अडकण्यासाठी नामी क्लुप्ती शोधली असून, खासगी व्यक्तींची खास यासाठी नियुक्तीच केली आहे.

  पडताळणीत पैसे मागितल्याचेही निष्पन्न

  राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे आठ विभाग आहेत. या विभागाकडून त्या-त्या परिक्षेत्रात लाच घेणाऱ्या लोकसेवकांवर सापळा कारवाई केली जाते. तर बेहिशोबी मालमत्ता जमविणाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल केले जातात. सर्व सामान्य नागरिक लोकसेवकाने लाचेची मागणी केली असता त्याबाबत एसीबीकडे तक्रार करतात. एसीबी प्रथम पडताळणीकरून कारवाई करते. पडताळणीत पैसे मागितल्याचेही निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल केला जातो.

  १ हजार ४४ लोकसेवकांना पकडले

  लाच लुचपत प्रतिबंधकच्या या ८ विभागांकडून १ जानेवारी ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत ७४८ सापळा कारवाई करून १ हजार ४४ लोकसेवकांना पकडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक कारवाया औरंगाबाद, नाशिक आणि पुणे परिक्षेत्रामध्ये झाल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. त्याखालोखाल ठाणे, नागपूर व नांदेड परिक्षेत्राचा क्रमांक लागत आहे.