नशा मुक्ती अभियानाला खांदेश्वर पोलिसांकडून हरताळ; ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्षामुळे हुक्का पार्लरसह गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री

महाराष्ट्र राज्याला हुक्का पार्लरवर बंदी आणण्याचा दोन नंबरचा बहुमान मिळाला आहे. असे असताना खांदेश्वर पोलीस ठाणे (Khandeshwar Police Station) हद्दीत राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू असल्याने नागरिकात तीव्र नाराजी पसरली आहे. झटपट पैसा कमविण्यासाठी अनधिकृत धंद्यावाल्यांच्या सध्या खांदा कॉलनीत (Khanda Colony) अनधिकृत धंद्यांना ऊत आला आहे.

    तळोजा : देशात (India) २००३ मध्ये हुक्का पार्लरवर बंदीची (Hookah Parlor Banned) अधिसूचना जारी केली. त्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी (Navi Mumbai Police Commissioner) नशा मुक्ती अभियान (Drug Free Campaign) सुरू केले आहे.

    महाराष्ट्र राज्याला हुक्का पार्लरवर बंदी आणण्याचा दोन नंबरचा बहुमान मिळाला आहे. असे असताना खांदेश्वर पोलीस ठाणे (Khandeshwar Police Station) हद्दीत राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू असल्याने नागरिकात तीव्र नाराजी पसरली आहे. झटपट पैसा कमविण्यासाठी अनधिकृत धंद्यावाल्यांच्या सध्या खांदा कॉलनीत (Khanda Colony) अनधिकृत धंद्यांना ऊत आला आहे. या शहरात हुक्का पार्लरची संख्या वाढत असून तरुणाई धुम्रवलयांच्या विळख्यात सापडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा जास्त समावेश आहे.

    खांदा कॉलनी शहरातील सरोवर हॉटेलच्या वरच्या मजल्यावर हुक्का पार्लर सुरू करण्यात आले असून यात तरुणाई ओढली जात असल्याने पालक वर्गात नाराजी पसरली आहे. सर्व सोयीसुविधाने व वाहतुकीसाठी महत्वाचे असलेल्या या शहराकडे अनधिकृत धांदेवाल्यानी मोर्चा वळविला असल्याचे दिसून येते.

    संबंधित यंत्रणेच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे हुक्का पार्लरसह गुटख्याची (Gutkha) मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुले जास्त ओढली जात असल्याने पालकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हुक्का पार्लरमुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला उपद्रव निर्माण होत असून त्यामुळे खांदा कॉलनीतील जनतेचा याला तीव्र विरोध होत आहे.

    हुक्का पार्लरवरील छाप्याविषयी हुक्का पार्लर मालकाला विचारले असता असे छापे पैशासाठीच पडतात. या भागातील हुक्का पार्लर चालू करण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्याला एक करोड रुपये दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.