
विकृत बदनामीकारक लिखाण करणाऱ्या जेम्स लेनच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील ४५ शिवप्रेमींवरील खटला रद्द करण्यात आला आहे.
इंदापूर : विकृत बदनामीकारक लिखाण करणाऱ्या जेम्स लेनच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील ४५ शिवप्रेमींवरील खटला रद्द करण्यात आला आहे.
विकृत बदनामीकारक लिखाण करणाऱ्या जेम्स लेनच्या विरोधात सन २०१३ मध्ये इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमींनी आंदोलन केले होते. त्याबाबत इंदापूर पोलीसांनी ४५ जणांवर गुन्हा दाखल केला होता. आंदोलकांच्या वतीने ॲड. सचिन चौधरी यांनी खटल्याचे काम पाहिले. त्यांनी आंदोलकांना विनाशुल्क जामीन त्यांनी मिळवून दिले. खटल्याचे कामकाजही विनामूल्य पाहिले.
ॲड. सचिन चौधरी यांचा यशस्वी पाठपुरावा
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे खटला मागे घेण्यात यावा, यासाठी संबंधित खात्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने खटला रद्द केल्याची बाब ॲड. चौधरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे खटला रद्द झाला.
न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मराठा समाजाने दिलेली जबाबदारी ॲड. सचिन चौधरी यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली. शिवभक्त मावळ्यांच्या लढ्याला यश मिळाले.
-प्रा. डॉ. जयश्री गटकूळ, जिल्हाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड.