महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा तत्काळ करावा; हिंदू जनजागृती समितीचे आवाहन

इस्लामी परंपरांचे पालन करत नाही म्हणून रुपाली चंदनशिवे हिची पती इक्बाल मोहम्मद शेख याने गळा चिरून हत्या केली; तर आफताबने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर हिने लग्नासाठी हट्ट केला म्हणून निर्घृण हत्या केली. या गंभीर प्रकरणांमुळे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा तत्काळ करावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाड्ये यांनी केले आहे.

    मुंबई – इस्लामी (Islam) परंपरांचे पालन करत नाही म्हणून रुपाली चंदनशिवे (Rupali Chandanshive) हिची पती इक्बाल मोहम्मद शेख याने गळा चिरून हत्या (Murder) केली; तर आफताबने (Aaftab) लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Live In Relationship) राहणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हिने लग्नासाठी हट्ट केला म्हणून निर्घृण हत्या केली. या गंभीर प्रकरणांमुळे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी (Love Jihad Act) कायदा तत्काळ करावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे (Hindu Janjagruti Samiti) पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाड्ये यांनी केले आहे.

    बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे रविवारी हिंदू राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. यावेळी व्याख्यानकार योगेश महाराज साळेगांवकर, सनातन संस्थेच्या स्वाती खाड्ये उपस्थित होत्या. मनोज खाड्ये म्हणाले, काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे हिंदू, ख्रिस्ती, बौद्धाची संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अधिकार दिले आहेत. येथील कंकालेश्वर मंदिराची भूमी नियमबाह्य विक्री झाली. अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणाहून सोडलेले सांडपाणी मंदिराच्या दिशेने आहे, तसेच त्या ठिकाणी संरक्षक भिंत नाही.

    स्वाती खाड्ये म्हणाल्या, पुढारलेपणाच्या नावाखाली आपण महान हिंदू धर्मापासून दूर चाललो आहोत. विदेशामध्ये हिंदू धर्म, योग, आयुर्वेद याविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण होत आहे. पुढे विदेशातील लोकांकडून हिंदू धर्माचे धडे गिरविण्याची वेळ येईल. यावेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.