antilia explosives case update no evidence against parambir singh high court rejects plea seeking probe into involvement nrvb

अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परशुराम शर्मा यांनी याचिकेतून केली होती. आपल्याला या प्रकरणाबाबत माहिती असून परमबीर हे आरोपींपैकी एक असण्याची शक्यता आहे, असा दावा शर्मा यांनी याचिकेत केला होता.

मयुर फडके, मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर (Antillia Residence) सापडलेली स्फोटके (Explosives) आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही, असे उच्च न्यायालयाने (High Court) स्पष्ट केले. तसेच परमबीर यांच्या प्रकरणातील सहभागाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

परमबीर यांच्याविरोधात आरोप करणारी याचिका ही ऐकीव माहितीवर आधारित असल्याची टिप्पणीही न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना केली.

अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते परशुराम शर्मा यांनी याचिकेतून केली होती. आपल्याला या प्रकरणाबाबत माहिती असून परमबीर हे आरोपींपैकी एक असण्याची शक्यता आहे, असा दावा शर्मा यांनी याचिकेत केला होता. सुरुवातीला याचिकाकर्त्याच्या माहितीचा स्त्रोत फक्त वर्तमानपत्रातील बातम्या होत्या. परंतु नंतर, याचिकाकर्त्यानी माहिती गोळा केल्यानंतर परमबीर यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली असल्याचे याचिकेत म्हटले होते.