Dr. Bone journalist lost through avachats: Congress state president Nana Patole

मविआमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राष्ट्रावादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यानंतर आता नाना पटोलेंनी आघाडीत न राहण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कधीही काहीही होऊ शकते असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले आहे. त्यामुळं यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर येते हे पाहावे लागेल.

    मुंबई : राज्यात एकीकडे भोंग्यावरुन राजकारण सुरु असताना, दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी असणारे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांमध्ये सुद्धा चढाओढ व कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. या तीन पक्षाचे राज्यात सरकार येऊन आता अडीच वर्ष होऊन गेले असले तरीसुद्धा अधूनमधून नाराजीचे सूर उमटत असतात. पण आता मविआमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राष्ट्रावादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यानंतर आता नाना पटोलेंनी आघाडीत न राहण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कधीही काहीही होऊ शकते असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले आहे. त्यामुळं यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर येते हे पाहावे लागेल.

    दरम्यान, आपण राज्यातील सद्य परिस्थितीची माहिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिली आहे. यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काही धोका आहे का? असे त्यांना विचारण्यात आले होते. यावर ते म्हणाले की, कधीही काहीही होऊ शकते. हा निर्णय काँग्रेस हायकमांडला घ्यायचा आहे. महाराष्ट्रातून काँग्रेसला संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणतीही कसर सोडत नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. गोंदिया-भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात केला होता. याबाबतची माहिती काँग्रेस नेतृत्वाला दिली असून याबाबत ते निर्णय घेतील असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

    युती चालवण्यासाठी समान किमान कार्यक्रम तयार करण्यात आला. मात्र मैत्रीच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेससोबत गद्दारी करत आहे. हे आम्हाला मान्य नाही असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. अमरावतीमध्येसुद्धा पाठीत खंजीर खुपसला आहे. भंडारा येथेही असाच प्रकार घडला. गोंदिया व भंडाराबाबत मी स्वतः राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोललो, पण त्यांनी सहकार्य केले नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.