अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्षपदी आप्पा शिंदे यांची निवड

अखिल भारतीय औषध विक्रेता संघाची सर्वसाधारण सभा इंदोर येथे सुरू असता कार्यकारिणीने तीन वर्षाकरिता शिंदे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

    कल्याण : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी कल्याण येथील जगन्नाथ तथा आप्पा शिंदे यांची इंदोर येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. आप्पा शिंदे माजी आमदार असून तसेच ते कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत.
    अखिल भारतीय औषध विक्रेता संघाची सर्वसाधारण सभा इंदोर येथे सुरू असता कार्यकारिणीने तीन वर्षाकरिता शिंदे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची निवड सहाव्यांदा करण्यात आली असून सरचिटणीस पदी मध्य प्रदेशचे राजीव सिंगल तर जासू भाई पटेल यांची पी आर ओ पदी निवड करण्यात आली आहे. इंदोर येथील ब्रिलियंट कन्वेंशन सेंटर येथे दीड ते 2000 केमिस्ट बांधवांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे.