
मंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde tweet) एक ट्विट केलं आहे, त्यात “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले (Shivsena MLA Bharat Gogawale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री. सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.” अशा प्रकारे ट्विट केले आहे.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) काल सुरतमध्ये (Surat) जवळपास 30 आमदार (MLA) संपर्कात होते. आज या संख्येत भर पडली असून, 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे हि संख्या वाढणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. दरम्यान, आता एकनाथ शिंदेंनी कालच्या ट्विटनंतर आता पुन्हा एक ट्विट केलं (Eknath Shinde) असून त्यात त्यांच्या गटातील विधिमंडळ मुख्य प्रतोदपदाची घोषणा केली आहे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदेंनी एक ट्विट केलं आहे, त्यात “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले (Shivsena MLA Bharat Gogawale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री. सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.” अशा प्रकारे ट्विट केले आहे. दरम्यान, शिंदेंनी आपल्या गटातील असून त्यांनी विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले (Shivsena MLA Bharat Gogawale) यांच्या नावाची घोषणा केली असून, आमदारांना आजच्या बैठकीबद्दल हजर राहण्याचे काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असं म्हटललं आहे. त्यामुळं यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र आजच्या बैठकीला बंडखोर आमदार हजर राहणार का, हे पाहणे औत्सुकतेचं ठरणार आहे.