मेट्रो ५ च्या उल्हासनगर पर्यंत विस्तारासाठी सल्लागाराची नियुक्ती, आम्ही करून दाखविले – शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याप्रती असलेल्या प्रेमामुळे आणि विकासात्मक दृष्टिकोनामुळे मुख्यमंत्र्यांनी मागील महिन्यात कल्याण मध्ये झालेल्या जाहीर सभेत मेट्रो ५ कल्याण पश्चिम मध्ये म्हणजेच दुर्गाडी ते खडकपाडा आणि बिर्ला कॉलेज ते उल्हासनगर असा विस्तारित मार्ग होणार असल्याचे स्पष्ट केले. या कामाकरीता एमएमआरडीए कडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक लावून विसतारित मेट्रो ५ संदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण : मेट्रो मार्ग ५ (Metro 5) दुर्गाडी चौक-खडकपाडा-बिर्ला कॉलेज -उल्हासनगरच्या विस्ताराची (Extension) त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प (Project) तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे (A consultant has been appointed). त्यामुळे जे बोललो ते आम्ही करून दाखवले असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील (Shiv Sena city chief Ravi Patil) यांनी दिली.

मेट्रो ५ ठाणे -भिवंडी- कल्याण प्रकल्प येणार आहे. असं जेव्हा २०१६ साली हा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला, तेव्हा मेट्रो-५ चा मार्ग दुर्गाडी चौक- सहजानंद चौक-एपीएमसी असा निश्चित करण्यात आला होता. सदर मार्ग लोकोपयोगी नसल्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा मार्ग चुकीचा असल्याचे निदर्शनास आणण्यात आले होते. त्यावेळी २०१६ साली हा मेट्रोचा मार्ग बदलून दुर्गाडी चौक-खडकपाडा-बिर्ला कॉलेज-प्रेमऑटो असा असावा याकरिता मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव आल्यापासून २०१६ पासून रवी पाटील अग्रेसर होते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांना रवी पाटील यांनी सदर प्रस्ताव मांडला. कल्याण हे विकसित होत असून वाढते नागरीकरण लक्षात घेता ९०% नागरिक ही दररोज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, तळोजा यासारख्या विविध औद्योगिक क्षेत्रात काम करण्याकरिता प्रवास करित असतात. येथील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा याकरीता शहराच्या विकासासोबतच मेट्रोचाही विकास कल्याण मध्ये व्हावा याकरिता २०१६ ते २०२३ असे ७ वर्ष सातत्याने एमएमआरडीएचे अधिकारी आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार पाठपुरावा रवी पाटील करत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याप्रती असलेल्या प्रेमामुळे आणि विकासात्मक दृष्टिकोनामुळे मुख्यमंत्र्यांनी मागील महिन्यात कल्याण मध्ये झालेल्या जाहीर सभेत मेट्रो ५ कल्याण पश्चिम मध्ये म्हणजेच दुर्गाडी ते खडकपाडा आणि बिर्ला कॉलेज ते उल्हासनगर असा विस्तारित मार्ग होणार असल्याचे स्पष्ट केले. या कामाकरीता एमएमआरडीए कडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक लावून विसतारित मेट्रो ५ संदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच या मेट्रो कामाचा देखील शुभांरभ होणार आहे.

कल्याण शहरातील नागरिकांना मेट्रो ५ प्रकल्पामुळे येणाऱ्या काळात नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यात उल्हासनगर-टिटवाळा-मुरबाड भागात देखील मेट्रोचे जाळे पसरवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होणार असून आपले कल्याणकरांचे स्वप्न पुर्ण होणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले.