रायगड जिल्हाधिकारी पदी किशन जावळे यांची नियुक्ती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकारकडून बदल्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु असून रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त कोकण विभाग पदी कार्यरत असणारे किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती सरकारकडून बदल्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्याचा खटाटोप राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री करीत असून त्याचाच एक भाग म्हणून रायगडचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अप्पर आयुक्त कोकण विभाग किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे.

    रायगडचे मावळते जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची रायगड जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली असली तरी त्यांना अद्याप कोणत्याही ठिकाणी नियुक्ती दिलेली नाही.