जळगाव दुग्धविकास संस्थेच्या मुख्य प्रशासकपदी आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती

माजी जि.प.सदस्य राजेंद्र वाडीलाल राठोड यांची सहप्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दोघांच्या नेमणुकीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

    चाळीसगाव : जळगाव जिल्हा सहकारी दुग्धविकास संस्था मर्यादित (Jalgaon District Cooperative Dairy Development Society Limited, Jalgaon) जळगांव या संस्थेच्या मुख्य प्रशासकपदी (Chief Administrator) चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवड झाली(Chalisgaon MLA Mangesh Chavan was elected).

    तर माजी जि.प.सदस्य राजेंद्र वाडीलाल राठोड यांची सहप्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दोघांच्या नेमणुकीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्यातील भाजपामधील अनेक राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.