‘बजरंगीं’च्या सेवाकार्याचे शिवभक्तांकडून कौतुक  ; भीमाशंकरला राजगुरूनगर, चाकणच्या कार्यकर्त्यांची सेवा

हिंदूंच्या पवित्र अशा श्रावण मासाची सुरुवात झाली असून पहिल्या श्रावणी सोमवारी विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्ह्याच्या वतीने बारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री भीमाशंकर येथे राजगुरुनगर शहर प्रखंड व चाकण शहर प्रखंडच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांसाठी सेवाकार्य केले.

  वाडा : हिंदूंच्या पवित्र अशा श्रावण मासाची सुरुवात झाली असून पहिल्या श्रावणी सोमवारी विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्ह्याच्या वतीने बारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री भीमाशंकर येथे राजगुरुनगर शहर प्रखंड व चाकण शहर प्रखंडच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांसाठी सेवाकार्य केले.

  -मंदिर परिसरात या सेवेत सहभाग
  मंदिर देवस्थान, पोलिस प्रशासन, सरकारी यंत्रणा, वैद्यकीय सेवा यांच्यामदतीने बजरंग दलाचे कार्यकर्ते भाविकांच्या रांगा लावणे, मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा केंद्र दाखवणे, वाहनतळावरील बसेसमध्ये ये – जा करणाऱ्या भाविकांना मदत करणे, मंदिर परिसरातील स्वच्छता आदी सेवाकार्य केले.

  -यांनी केले मदतकार्य
  यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल भीमाशंकर जिल्हा संयोजक गणेश रौंधळ, राजगुरूनगर शहर प्रखंड संयोजक अवधूत चौधरी, संयोजक मयूर सावंत, चाकण शहर प्रखंड संयोजक मनोज देशमुख, अमित बुरुड, ओमकार जाधव, हर्षद भुजबळ, अनिकेत गायकवाड, राकेश कोळी, केतन सोनावणे, शुभम पाचांगे, कुणाल इंगळे, अनिल भोसले व इतर सहकारी अशा २० बजरंगी पथकाने आपली सेवा बजावली.

  यावेळी श्री भीमाशंकर देवस्थान व्यवस्थापक समिती, खेड आणि मंचर पोलिस, वैद्यकीय अधिकारी, वनविभाग प्रशासन यांनी  बजरंगींनी केलेल्या सेवा कार्याचे कौतुक केले.