Minister Nawab Malik appeals to apply for the benefit of grant scheme for minority student-dominated schools and madrasas

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वैद्यकीय चाचणीसाठी केलेला अर्ज शनिवारी मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. वैद्कीय चाचण्यांनंतर मलिक यांच्या किडनीवरील शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

    मुंबई : ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे समोर येताच ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. तेव्हापासून मलिक कारागृहात आहेत. मलिक अनेक दिवसांपासून मुत्राशयाच्या त्रासाने त्रस्त आहेत. न्यायालयाच्या परवानगीनंतरच मलिक सध्या कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

    शस्त्रक्रियेपूर्वी वैद्यकीय चाचणीची परवानगी देण्याची मागणी करणारा अर्ज मलिक यांनी सत्र न्यायालयात दाखल केला होता. रेनल स्कॅन टेस्ट (किडनीसंबंधित सोनोग्राफी)ची परवानगी मागण्यात आली होती. त्या चाचणीच्या अहवालावर मलिका यांच्या डाव्या किडनीवरील शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय होणार आहे.

    जामीन अर्जावर १२ ऑगस्टला सुनावणी

    विशेष न्यायालयात मलिक यांनी जामीनासाठी अर्ज केला असून त्या अर्जावर मलिक यांच्यावतीने युक्तिवाद पूर्ण झाला आहे. पाच महिन्यांपासून मलिक तुरुंगात आहेत. तसेच संपूर्ण एफआयआरमध्ये गुन्ह्याच्या कालावधीचा उल्लेख नाही. परंतु, डी कंपनी विरोधातील २००३ च्या निर्णयाचा संदर्भ त्यात नमूद करण्यात आला असून त्या प्रकरणात मलिकचा नामोल्लेख नाही. तसेच इक्बाल मिर्ची प्रकरणातही मलिकांच्या नाव दिसून येत नाही. असे सांगत अँड. अमित देसाई यांनी आपला युक्तिवाद संपवला. त्यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल शुक्रवारी उत्तर देणार आहेत.