आरोग्यपूर्ण सौंदर्यवृद्धीसाठी ‘अर्चनाज हर्बल’; पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रभावी मिलाफ

आयुर्वेदासारख्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा वापर करून विकसित केलेली विविध उत्पादने 'अर्चनाज हर्बल'ने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या उत्पादनांच्या नियमित वापराने त्वचा आणि केसांसारख्या अवयवांचे केवळ सौंदर्यच नव्हे तर आरोग्यही वृद्धिंगत होत असल्याचा दावा उत्पादकांनी केला आहे.

    अहमदनगर : आयुर्वेदासारख्या भारतीय (India) पारंपरिक ज्ञानाचा वापर करून विकसित केलेली विविध उत्पादने ‘अर्चनाज हर्बल’ने ग्राहकांसाठी (Grahak) उपलब्ध करून दिली आहेत. या उत्पादनांच्या नियमित वापराने त्वचा आणि केसांसारख्या अवयवांचे केवळ सौंदर्यच नव्हे तर आरोग्यही वृद्धिंगत होत असल्याचा दावा उत्पादकांनी केला आहे.

    केसांची चमक वाढविण्याबरोबरच केस गळणे, तुटणे, कोंडा पांढरे होणे असे दोष दूर करणारी आणि केसांना नैसर्गिक रंग प्रदान करून मुलायम बनविणारी मेहेंदी, केसांमधील अनावश्यक तेलकटपणा आणि मळ दूर करून केस स्वच्छ आणि तलम बनविणारे हेअर वॉश, चेहेऱ्यावरील मळ, तेलकटपणा, कोरडेपणा दूर करून तजेलदार बनविणारे फेस पॅक, आंघोळीसाठी रासायनिक घटकांचा वापर करून बनविलेल्या सांबणांना आरोग्यदायी पर्याय ठरणारे बॉडी स्क्रब, त्वचेला तजेला आणि मुलायमपणा देणारे मॉइश्चरायझर अशी विविध प्रकारची ९ उत्पादने ‘अर्चनाज हर्बल’ने विकसित केली आहेत. या उत्पादनांमध्ये कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर न करता कटाक्षाने औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतीजन्य घटकांचा कटाक्षाने वापर केला जातो. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम किंवा ‘साईड इफेक्ट’ होण्याची भीती रहात नाही.

    तळपायांच्या आरोग्याची काळजी घेणारे ‘कोरल फूट स्प्रे’ हे ‘अर्चनाज हर्बल’चे नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. तळपायांना भेगा पडणे, बूट वापरताना तळपायांना घाम आणि दुर्गंध येणे, फंगल इन्फेक्शन, जळवात, मधुमेहामुळे तळपायाची आग होणे आदी विकारांवर हा स्प्रे तळपायांवर फवारणे हा प्रभावी पूरक उपाय आहे.

    ‘अर्चनाज हर्बल’ची सुरुवात सुमारे १५ वर्षांपूर्वी अर्चना पलुस्कर यांनी गृहोद्योगाच्या स्वरूपात केली. त्यांच्या मातुल घराण्यात तीन पिढ्यांपासून होत असलेला आयुर्वेदाचा व्यासंग त्यासाठी चांगलाच उपयुक्त ठरला. केवळ उटण्यासारख्या उत्पादनातून सुरू झालेला हा उद्योग आता विविध हर्बल उत्पादने विकसित करणारा एक मान्यताप्राप्त लघु उद्योग म्हणून नावारूपाला आला आहे. नजीकच्या भविष्यात ग्राहकांना उपयुक्त ठरतील अशा नाविन्यपूर्ण उत्पादनांची मालिका उपलब्ध करून देण्याचा पलुस्कर यांचा मानस आहे. सध्या ही उत्पादने प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि पुणे, अहमदनगर जिल्ह्यात उपलब्ध लवकरच वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांचे जाळे राज्यभर विस्तारण्याचे ‘अर्चनाज हर्बल’चे नियोजन आहे.