Bhidewada memorial work will start! The Supreme Court dismissed the tenants' petition; The way for Pune Municipal Corporation is clear
Bhidewada memorial work will start! The Supreme Court dismissed the tenants' petition; The way for Pune Municipal Corporation is clear

  पुणे : महात्मा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली, अशा भिडे वाड्याच्या ठिकाणी स्मारक तयार करण्यासाठी तीन वास्तुविशारदांनी महापालिकेला आराखडे सादर केले आहे. त्याचवेळी वाड्यातील भाडेकरूंनी महापालिकेच्या ताब्यात जागा देण्यासाठीची मुदत वाढविण्याची मागणी सर्वाेच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.

  मालक आणि भाडेकरूंकडून सर्वाेच्च न्यायालयात दाद

  महापािलकेच्या सर्वसाधारण सभेने २००८ साली भिडे वाडा येथे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानंतर सुमारे तेरा वर्ष या जागेचा वाद हा न्यायालयात प्रलंबित राहिला हाेता. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला हाेता. त्याविराेधात जागा मालक आणि भाडेकरूंनी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली हाेती. नुकतेच सर्वाेच्च न्यायालयाने भिडे वाड्यासंदर्भात निर्णय दिला आणि त्यानंतर सदर जागा महापािलकेच्या ताब्यात घेण्याचा मार्ग माेकळा झाला हाेता.

  पुणे महापालिकेकडून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू

  त्यानुसार महापालिका प्रशासनाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू केली. तसेच या स्मारकाचा अाराखडा तयार करण्याचे अावाहन वास्तु िवशारदांना केले हाेते. त्यानुसार शहरातील तीन प्रसिद्ध वास्तु िवशारदांनी अाराखडे सादर केले अाहेत. त्यांचे एकत्रित सादरीकरण पाहून त्यापैकी एक अाराखडा मंजुर केला जाईल.

  जागा ताब्यात देण्यासंदर्भात भाडेकरूंना ३ डिसेंबरची मुदत

  सर्वाेच्च न्यायालयाने जागा ताब्यात देण्यासंदर्भात भाडेकरूंना ३ डिसेंबरची मुदत दिली आहे. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी करणारी याचिका मालक आणि भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यामुळे जागा महापालिकेच्या ताब्यात येण्यास विलंब लागण्याची शक्यता अाहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली नाही, त्यामुळे मुदतीत ही जागा ताब्यात घेण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. ३ डिसेंबर रोजी रविवार आहे. त्यादिवशी महापालिकेला सुटी असुन, दुसऱ्या िदवशी म्हणजे ४ डिसेंबर राेजी जागा ताब्यात घेण्यात येईल असे महापािलकेच्या सुत्रांनी सांगितले.

  बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये देशातील मुलींची पहिली शाळा

  महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये देशातील मुलींची पहिली शाळा सुरु केली. फुले दांपत्यांच्या या कार्यास अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी म्हणून भिडे वाडा हा राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, अशी मागणी गेल्या अनेक सर्वच पक्षांकडून केली जात अाहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षांकडून सातत्याने आंदोलने झाली आहेत.