Bacchu Kadu

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी लावण्यात आली होती. मात्र देशभरात सगळीकडे कांदा निर्यात बंद असूनसुद्धा केंद्र सरकारने गुजरातमधील तब्बल २ हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला (Exports Of Onions) मंजुरी दिली आहे.

    केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी लावण्यात आली होती. मात्र देशभरात सगळीकडे कांदा निर्यात बंद असूनसुद्धा केंद्र सरकारने गुजरातमधील तब्बल २ हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला (Exports Of Onions) मंजुरी दिली आहे. केंद्रातून देण्यात आलेल्या या मंजूरीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. तसेच विरोधकांकडून देखील अनेक टीका केल्या जात आहेत. त्यातच प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

    महाराष्ट्र गुजरातमधील शेतकरी वेगळा आहे का?

    बच्चू कडू म्हणाले, केंद्र सरकारने नवीन जातीवाद निर्माण केला आहे. गुजरातचा शेतकरी वेगळा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा. अशी भूमिका केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. या सगळ्याचा शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. जर निर्यात करायची असेल तर सगळ्या भागातील निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी. हा निर्णय देशभरातील शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे. केंद्र सरकारकडून दुप्पटी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर वेळीच निर्णय मागे घेणे अपेक्षित नाहीतर वेळ पडली तर आम्ही त्यासाठी मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरू, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

    शेतकरी माझ्यासाठी प्रथमस्थानी आहेत- बच्चू कडू

    पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत. मी त्यांना पाठिंबा दिला असून मी त्यांच्या २ ते ३ सभेला देखील जाणार आहे. मी जेव्हा पाठिंबा जाहीर केला त्यावेळी मला राज्यातील काही मराठा नेत्यांचे फोन आले होते. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये २ मराठा समाजाचे नेते निवडणूक लढण्यासाठी उभे आहेत. त्यामुळे तुम्ही स्वत: मराठा असूनही राजू शेट्टीना पाठिंबा का देताय? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. माझ्यासाठी प्रथमस्थानी शेतकरी आहेत. राजू हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी झटत असतात, असे बच्चू कडू म्हणाले.