मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या 3 कोटी तरी आहे का?; बबनराव तायवाडे यांचा जरांगेना सवाल

मुंबईतील पायी मोर्चात 3 कोटी मराठा समाज सहभागी होईल असा दावा मनोज जरांगे यांनी केलाय, यावर बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या 3 कोटी तरी आहे का? असा सवाल बबनराव तायवाडे यांनी जरांगेना केला आहे.

    मुंबई : मुंबईतील पायी मोर्चात 3 कोटी मराठा समाज सहभागी होईल असा दावा मनोज जरांगे यांनी केलाय, यावर बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या 3 कोटी तरी आहे का? असा सवाल बबनराव तायवाडे यांनी जरांगेना केला आहे. तायवाडे यांच्या उपस्थितीत वडीगोद्री येथील ओबीसी समाजाचं साखळी उपोषण 27 व्या दिवशी मागे घेण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते.

    जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार आता कमी झालीय असा टोला तायवाडे यांनी लगावला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का असे देखील ते म्हणाले.