शिवीगाळ न करण्याची विनंती केल्याने झाला वाद; टोळक्याकडून रेस्टॉरंटमध्ये कुटुंबाला मारहाण

अमरावती मार्गावरील नाईट ओउल रेस्टॉरेंटमध्ये काही असामाजिक तत्वांनी हैदोस घातला. शिवीगाळ करण्यास विरोध केला असता आरोपींनी एका कुटुंबाला मारहाण (Crime in Nagpur) केली. इतकेच नाहीतर बिअरची बॉटल आणि रॉडने मारून महिलेसह तिघांना गंभीर जखमी केले.

    नागपूर : अमरावती मार्गावरील नाईट ओउल रेस्टॉरेंटमध्ये काही असामाजिक तत्वांनी हैदोस घातला. शिवीगाळ करण्यास विरोध केला असता आरोपींनी एका कुटुंबाला मारहाण (Crime in Nagpur) केली. इतकेच नाहीतर बिअरची बॉटल आणि रॉडने मारून महिलेसह तिघांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी विक्रांत राजेश तिवारी (25, रा. अनंतनगर)च्या तक्रारीवरून तीन जणांवर गुन्हा नोंदविला आहे.

    कार्तिक अंगावर धावून आला. नन्नावरे (25), विशाल शाहू (22) आणि श्रेणल मेश्राम ( 19 ), अशी आरोपींची नावे आहेत. शनिवारी रात्री विक्रांत कुटुंबासह अमरावती मार्गावरील नाईट ओउल रेस्टॉरंटमध्ये रात्री 1 वाजताच्या सुमारास शेजारच्या टेबलवर काही तरुण मित्राचा वाढदिवस साजरा करत होते. या दरम्यान तरुणांनी आपसात शिविगाळ सुरू केली. आदित्यने त्यांना महिला व मुले असल्याने शिवीगाळ न करण्याची विनंती केली. श्रेणलने शिवीगाळ करण्यासाठी माफी मागितली. मात्र, कार्तिकने श्रेणलला माफी मागण्यास मनाही केली.

    विक्रांतने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिघांनीही त्यांना मारहाण केली. आरोपी तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. विशालने आदित्यला फेकून मारलेली बिअरची बॉटल त्यांच्या पत्नीच्या डोक्याला लागली. रेस्टॉरेंटच्या मालकाने मध्यस्थी करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान कार्तिकने लोखंडी रॉडने विक्रांतवर वार केला. विक्रांत वाचण्यासाठी हटले असता रॉड आदित्यच्या पत्नीला लागला. तिघांनाही गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी तरुण आपल्या जीपने फरार झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे.