जेवण वाढताना वाद, महिलेकडून पतीवर चाकूने वार; पुण्यातील घटना

जेवण वाढत असताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना घडली. पुण्याच्या मध्यभागात हा प्रकार घडला असून, भवानी पेठेत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ घडाली आहे.

    पुणे : जेवण वाढत असताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना घडली. पुण्याच्या मध्यभागात हा प्रकार घडला असून, भवानी पेठेत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ घडाली आहे.

    याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    रविवारी रमेश ससाणे कामावरुन घरी जेवण करण्यास आले. त्यावेळी पत्नी जयाने त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश यांनी पत्नीला चापट मारली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. जयाने पती रमेश यांचा दंड आणि पाठीवर चाकूने वार केले. सहायक फौजदार भाेसले अधिक तपास करत आहेत.