हॉटेल चालकासोबत मटणाच्या ग्रेव्हीवरून वाद, ग्राहकाची बेदम मारहाण

मागे कोपरखैरणे मधील कॉलीटी ऑफ पंजाबमध्ये एका रल्वे पोलिसांवर हल्ला केला होता. त्यामुळे नवी मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणारे बळी पडत असतील तर सामान्य नागरिकांचं काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

    कोपरखैरणे :- कोपरखैरणे सेक्टर 14 येथील जगंदब हॉटेलमध्ये बुधवारी साडे अकाराच्या सुमारास जेवणासाठी गेले होते. फिर्यादी किरण दानवे व हॉटेलचे वेटर आणि मालक यांच्यामध्ये मटणाच्या ग्रेव्ही वरून वाद झाला.यावेळी हॉटेलचे मालक अक्षय जाधव व तीन अनोळखी इसम यांनी फिर्यादी किरण साबळे यांना हाताने आणि हॉटेलमधील खुर्चीच्या साहाय्याने जबर मारहाण केली.

    या मारहाणीमध्ये फिर्यादी किरण साबळे यांच्या वरच्या ओटास गंभीर मार लागला असून दुखापत झाली आहे. ह्या मारहाणीच्या घोळक्यातून फिर्यादीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र इसमानी हॉटेलचे शटर बंद करून फिर्यादीला बाहेर जाण्यास पूर्णपणे रोखुन शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली आहे. तसेच फिर्यादीवर सत्यम हॉस्पिटल कोपरखैरणे इथे उपचार चालू आहेत. ह्या घडलेल्या सर्व प्रकरणाबाबत फिर्यादी किरण साबळे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असून ह्या घडलेल्या प्रकरणाबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस कर्मचारी सदर व्यक्तींचा अधिक तपास करत असल्याचे संबंधित पोलिसांनी सांगितले.सदर प्रकरणातला फिर्यादी हे पोलीस असल्याचे सांगितले जात आहे.

     

    मागे कोपरखैरणे मधील कॉलीटी ऑफ पंजाबमध्ये एका रल्वे पोलिसांवर हल्ला केला होता. त्यामुळे नवी मुंबई कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणारे बळी पडत असतील तर सामान्य नागरिकांचं काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.