कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर-रावसाहेब दानवे एकत्र; शिंदे गटात सामील होणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यातही ते अपयशी ठरताना दिसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली.

    नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) ब्रेकफास्टला एकत्र (Together For Breakfast) आले आहेत. रावसाहेब दानवे यांच्या घरी अर्जुन खोतकर दाखल झाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीनंतर खोतकर दानवे यांच्या भेटीला पोहोचले.

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यातही ते अपयशी ठरताना दिसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. आज त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरी ब्रेकफास्टला हजेरीही लावली आहे.

    अर्जुन खोतकर यांचा जालना जिल्ह्यात चांगला प्रभाव मानला जातो. खोतकर यांच्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीला केंद्रीय मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते. या भेटीनंतर अर्जुन खोतकर लवकरच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या छावणीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.