अर्पण ग्रुपने साकारली दिव्यांच्या मदतीने राम मंदिर प्रतिकृती

अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली. याचे औचित्य साधून वाई येथील सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अर्पण समूहाने आणि धर्मपूरी घाट संस्थान वाई येथे स्वच्छता अभियान राबवले. हजारो दिवे प्रज्वलित करून "प्रभू श्री राम मंदिराची आरास" साकारली.

    वाई : अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली. याचे औचित्य साधून वाई येथील सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अर्पण समूहाने आणि धर्मपूरी घाट संस्थान वाई येथे स्वच्छता अभियान राबवले. हजारो दिवे प्रज्वलित करून “प्रभू श्री राम मंदिराची आरास” साकारली.

    २२ जानेवारी या दिवसाला भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक, सामाजिक आणि पारंपरिक महत्व प्राप्त झाले आहे.सुमारे ५०० वर्षांनंतर प्रभू श्री रामाचे अयोध्या नगरीमध्ये आगमन झाले.या निमित्ताने दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाई नगरी मधील सर्व ढोल पथकांनी मिळून तब्बल ३०० ढोल – ताशांच्या गजरात किसनवीर चौक, वाई येथे जल्लोष साजरा केला. याच जल्लोषात युवकांनी धर्मपुरी घाट, वाई येथे हजारो दिव्यांच्या मदतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिराची भव्य आरास साकारत समस्त वाईकरांना मंत्रमुग्ध केले.वाई परिसरातील हजारो राम भक्तांनी या मंदिर प्रतिकृतीचा लाभ घेतला. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. या वेळी श्री मयूर घार्गे यांनी घाट स्वच्छता कामी पाणी टँकर उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची पहिली पणती श्री मयूर घार्गे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. या वेळी धर्मपुरी घाट संस्थान, प्रतिष्ठान आणि अर्पण ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. या वेळी पंकज खागे, निखिल कारळे, भूषण मिस्त्री, मृणाल गव्हाणे, नेहा जायकर, हर्षदा यादव, वैष्णवी जाधव, मानसी बावसकर ,तेजस पंडित, प्रतीक सरकाळे, जय सकुंडे, अथर्व पोरे, मुनवा यादव, श्रीपाद माने, ओंकार शिंदे, शिवराज यादव, धनश्री पुदाले, राकेश पुदाले, शिवांश पुदाले, साहिल देशमाने, आदिराज घार्गे , राही घार्गे उपस्थित होते.