Arrest Nupur Sharma! Statement of the Muslim Association to the Governor through the Tehsildar

नुपूर शर्मा यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे केवळ देशाचेच नव्हे तर, जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहे. अशा लोकांवर तातडीने कारवाई करावी. त्याचा निषेध करून कायदा हातात घेणे, चुकीचे असल्याचेही म्हटले आहे.

    मंगरुळपीर : भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या ( Former BJP national spokesperson ) नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना अटक करावी, अशी मागणी मुस्लिम संघटनांच्या (Muslim organizations) वतीने मंगरूळपीर तहसीलदार (Mangrulpeer Tehsildar) यांच्यामार्फत राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुपूर शर्मा यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे केवळ देशाचेच नव्हे तर, जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहे. अशा लोकांवर तातडीने कारवाई करावी.

    त्याचा निषेध करून कायदा हातात घेणे, चुकीचे असल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर अशा लोकांना अटक करणे, घरे पाडणे ही प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. यावेळी कौमी तंजीमचे जिल्हाध्यक्ष मुख्तार खान पटेल, शहराध्यक्ष सलीम जहागीरदार, माजी नगरसेवक उबेद मिर्झा, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेख इरफान, माजी नगरसेवक लाईक अहमद, टिपू सुलतान सेनेचे शहराध्यक्ष जुबेर अहमद, युनूस खान कोठारीकर आणि मीर काशिफ अली, अ.गनी आदींसह अनेक मुस्लिम संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.