Arrest those who beat Talikote family; According to Aktracity, a crime has been filed

राठोड यांच्या नातेवाइकांनी लाठ्याकाठ्यांनी टाळीकोटे कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. त्यातून महिला ही सुटल्या नाही. त्यांच्या अंगावर काठीचे वळ उमटले. या सदस्यांना बेदम मारहाण केली. या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

    पुसद : तालुक्यातील कार्ला (Carla) येथील टाळीकोटे कुटुंबाला (Talikote family) वेदम मारहाण करणाऱ्या फरार आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर या घटनेचे पडसाद उमटतील, असा स्पष्ट इशारा सामाजिक कार्यकर्ते शीलानंद कांबळे यांनी दिला आहे.

    भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे गाणे डीजेवर वाजविण्यास विरोध करणारी ही मंडळी समाजात जातीयतेचे विष कालवत आहेत. त्यामुळे अशा आरोपींना कायद्याचा बडगा दाखवून वठणीवर आणावे, अशी अपेक्षा त्यांनी पोलीस प्रशासनाकडून (Police Administration) व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस महानिरीक्षक मीणा (Inspector General of Police Meena) यांची भेट घेतली.

    पुसद पासून जवळच ७ कि. मी. अंतरावर असलेल्या कार्ला या शांतीप्रिय गावात हा प्रकार घडला. निकिता प्रकाश टाळीकोटे या मुलीचा साक्षगंधाचा कार्यक्रम राहत्या घरी साजरा करण्यासाठी डीजे लावण्यात आला होता. या डीजेवर बाबासाहेबांचे गाणे वाजत होते. डीजे बंद करा, गाणे वाजवू नका या शब्दांत माजी सरपंचाचे पतीने दमदाटी केल्यानंतर वाद उसळला. यानंतर पोलिसांनी रमेश राठोड यांच्यासह १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आयपीएस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात आली. मात्र, हे आरोपी अद्यापही फरार आहेत.

    विघ्नसंतोषी लोकांच्या बेजबाबदार कृत्यामुळे ही घटना घडली. आरोपी विरुध्द अक्ट्रासिटी एक्ट (Atrocity act) नुसार गुन्हे दाखल झाले. पिडीत आशा टाळीकोटेवर पुन्हा २८ जुलैला अश्लील भाषेत शिविगाळ करीत हल्ला चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातील चार आरोपीवर अक्ट्रासिटी सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले. आशा लोकांना विरोध करीत त्यांना कायदाचा बडगा दाखविण्याची गरज असल्याची भूमिका शीलानंद कांबळे यांनी मांडली.

    टाळीकोटे कुटूंबातील सदस्यांना मारहाण

    राठोड यांच्या नातेवाइकांनी लाठ्याकाठ्यांनी टाळीकोटे कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. त्यातून महिला ही सुटल्या नाही. त्यांच्या अंगावर काठीचे वळ उमटले. या सदस्यांना बेदम मारहाण केली. या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, गावातील वातावरण तणावग्रस्त बनले.