Arvind More
Arvind More

'कल्याणमधील शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने काही वेळातचघुमजाव केले असून, मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मराठ्यांना आरक्षण एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे वक्तव्य केले आहे.

    कल्याण : मराठा मुख्यमंत्री असताना जर पोलीस मराठ्यांना नोटीस देत असतील तर मराठा मुख्यमंत्री नको, असे विधान करणारे शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाने काही तासांत घुमजाव करीत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी बोलताना अरविंद मोरे यांनी आजपर्यंत जितके मराठा मुख्यमंत्री मिळाले त्यात एकनाथ शिंदे हे वेगळे आहेत.

    दसरा मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण मिळवून देईल, असे आश्वासन दिले. मराठ्यांना आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असा आमचा सर्वांचा विश्वास आहे. मनोज जरांगे पाटील यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास व्यक्त केला आहे.

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठाच असला पाहिजे आणि ते एकनाथ शिंदेच असले पाहिजेत, असा माझ्या वक्तव्याचा अर्थ होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आरक्षण द्यावे, अशी आमची भूमिका आहे

    हो एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबई ठाणे येथील मराठी क्रांती मोर्चा मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते मराठा आरक्षण देतील मात्र त्यानंतर ही जर मराठा आरक्षण मिळत नसेल तर मी कल्याण जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.